Home बुलडाणा डाँ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी भाई सिध्दार्थ पैठणे यांची निवड

डाँ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी भाई सिध्दार्थ पैठणे यांची निवड

296

देऊळगाव – प्रतिनिधी

नाशिक येथील सोनावणे फाउंडेशनच्या वतिने २०२० या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या डाँ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी भाई सिध्दार्थ पैठणे यांची निवड करण्यात आली.विशेष म्हणजे फाउंडेशनच्या वतिने देण्यात येणाऱ्या पहिल्यांच पुरस्कारासाठी भाई सिध्दार्थ पैठणे यांची निवड झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील बहुजन चळवळीत एक मानाचा तुरा रोवला केला आहे.
बहुजन समाजाच्या सर्वागिन उन्नतीसाठी झटणार्या व्यक्तीना हा पुरस्कार दिला जातो.विविध सामाजिक व राजकीय संघटनाच्या माध्यमातून भाई सिध्दार्थ पैठणे यांनी बहुजन समाजातील गोर-गरिब,अनाथ,दिनदुबळ्या निराधारांच्या तसेच युवकांच्या समस्या शासन दरबारी मांडुन त्यांना न्याय मिळवुन देण्याचे भरिव काम त्यांनी केले आहे.

भिमा कोरेगांव येथे स्थापनन केलेल्या”युध्दभुमी फाउंडेशन” या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक सेवेचे व्रत हाती घेतलेल्या या भल्या माणसाचां पुरस्काराने यथोचित सन्मान केल्या असल्याची भावना जनसामान्यामध्ये आहे.दि.१४ एप्रील २०२० रोजी लंडन येथे एका भव्य समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.एका संघर्ष योध्द्याला या पुरस्काराच्या रुपाने न्याय मिळाला असल्याची भावना परिसरातुन व्यक्त होत असुन त्यांच्यावर शुभेच्छाचां वर्षाव होत आहे.