Home महत्वाची बातमी पैशाची मागणी करणाऱ्या शासनाच्या पांढर्या हत्तीचा व्हिडिओ व्हायरल

पैशाची मागणी करणाऱ्या शासनाच्या पांढर्या हत्तीचा व्हिडिओ व्हायरल

194

पांढरकवडा पोलिसांचा प्रताप

केळापूर आर्णी चे आमदार संदीप भाऊ धुर्वे यांचा पांढरकवडा पोलिसांना दणका

विधिमंडळात गाजवणार प्रश्न आमदाराचे आश्वासन

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. १५ :- पांढरकवडा वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई घाटंजी येथील क्रूजर वाहनाला पांढरकवडा घाटंजी मार्गावर (वन) मारेगाव जवळ पकडले व पैशाची मागणी करताना चित्रीकरण करण्यात आले त्या वाहनातील प्रवासी प्रशांत भोयर घाटंजी चुलत बंधू उमेश भोयर यांचे साक्षगंध करिता पांढरकवडा मार्गाने जात होते वाहतूक पोलिस नेहमी प्रमाणे दमदाटी करून वाहन चालकाकडून पैशाची मागणी करत होता याचे सर्व चित्रीकरण केले व्हिडिओ व्हायरल

झाल्यामुळे वरिष्ठ पोलिसांनी वाहतूक पोलिसाला प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून मंत्र दिले लगेच वाहतूक पोलीस शिपाई त्यांच्या वाहनाच्या मागावर दिवसभर्या पासून वाट बघत होता व पुन्हा वाहन पकडली व त्यांच्या कडून पोलीस स्टेशन मध्ये वाहन लावून प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून दमदाटी करून लिहून घेतले सामाजिक कार्यकर्ते अखिल कोठारे यांना या घटनेची माहिती होताच केळापूर आर्णी विधानसभा क्षेत्राचे आमदार संदीप भाऊ धुर्वे यांना दूरध्वनी द्वारे या घटनेची माहिती देऊन पोलिसावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

सदर घडलेली प्रकार तात्काळ चित्रीकरण बघून आमदार महोदयांनी पांढरकवड्याचे पोलीस निरीक्षक यांना दूरध्वनीवरून प्रकरणाची माहिती देताच पकडलेली क्रुझर वाहन काही क्षणातच पोलिसांनी वाहन सोडून दिली विधिमंडळात आवाज उठवून पांढरकवडा वाहतूक शाखेच्या पोलिसावर कारवाई करण्याचे आश्वासन आमदार संदीप धुर्वे यांनी दिले पाहूया या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अनिल देशमुख पालकमंत्री संजय राठोड केळापूर आमदार संदीप धुर्वे लाच लुचपत विभाग जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार्‍यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.