Home मराठवाडा आठ वर्षीय चिमुकली वर बलात्कार , “आरोपी फरार “

आठ वर्षीय चिमुकली वर बलात्कार , “आरोपी फरार “

187

अमीन शाह

परभणी , दि. १५ :- तालुक्यातील कुंडी येथील एका आठ वर्षीय बालीकेला अमिश दाखवून तीचे अपहरण करत अत्याचार केल्या प्रकरणी २५ वर्षीय युवका विरोधात सेलू पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत शनिवार १५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक भगवान बालटकर असे आरोपीचे नाव आहे. घराबाहेर अंगणात खेळत असलेल्या एका आठ वर्षीय बालीकेला खाण्याचे साहित्य देण्याचे आमीष दाखवून सदर आरोपीनी पळवून नेले. मुलगी घर आणि परिसरात दिसत नसल्याने पालकांनी तीचा शोध घेतला. यावेळी गावातील काही इसमांनी सदरची मुलगी अशोक बालटकर याच्या सोबत दिल्याचे सांगीतले. मुलीच्या वडीलांनी दिलेल्या आरोपी विरोधात पुâस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पालकांच्या शोध मोहीमेत शुक्रवारी सकाळी ही मुलगी अशोक यांच्या शेतात आढळून आली. यावेळी यांना पाहूण अशोकने पळ काढला. पोलीसांनी मुलीची चौकशी करत तीला जिल्हा रुग्णालयात दाखल करून तपासणी केली. शनिवार १५ पेâब्रुवारी रोजी तपासणीचा अहवाल प्राप्त होताच आरोपी अशोक बालटकर यांच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेलू पोलीस तपास करत आहेत. दरम्यान आरोपी अशोक हा फरार असून त्याच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. अशी माहिती पोनी वसुंधरा बोरगावकर यांनी दिली.