Home बुलडाणा पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या प्रमुखपदी ईश्वरसिंह ठाकूर

पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या प्रमुखपदी ईश्वरसिंह ठाकूर

201

अमीन शाह

खामगाव , दि. १६ :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या हल्ला विरोधी समितीच्या प्रमुख पदी दैनिक भास्कर चे ब्युरो चिफ ईश्वरसिंह ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली
पत्रकारांवर मोठ्या प्रमाणात हल्ला होत आहे, पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा अंमलात आणण्यासाठी सत्यत्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई च्या वतीने पाठपुरावा केला शासनाने दखल घेऊन पत्रकार संरक्षण कायदा तयार केला, पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळावी या साठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने हल्ला विरोधी समितीची निर्मिती केली असून त्या समिती प्रमुखपदी खामगाव येथील दैनिक भास्कर चे ईश्वरसिंह ठाकूर याची नियुक्ती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्री,वसंतराव मुंढे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे प्रदेश संघटक श्री, संजय भोकरे यांच्या स्वाक्षरीने केली आहे .
ठाकूर हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपद यशस्वी पणे सांभाळले आहे .याचीच पावती म्हणून संघटनेने पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या प्रमुख पदी त्यांची नियुक्ती केल्याने निश्चितच पत्रकारांना न्याय मिळेल .त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.