अमीन शाह
बुलडाणा , दि. १६ :- अन्न व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संबंध महाराष्ट्रात राजरोसपणे सुरू असलेला गुटखा नित्याचाच झाला असला तरी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ , राजेंद्र शिंगणे यांच्या धडक कारवाईचा धसका घेत. 16 रोजी शहरात चिखली पोलिसांनी धाड टाकीत जवळपास दोन लाखांचा गुटखा पकडला आहे. गुटखाबंदी केवळ नावालाच उरली असून मोठ्या प्रमाणात बाजारात गुटखा सहज उपलब्ध होत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आज ता. 16 रोजी शासन प्रतिबंधित असलेला नजर 9000 केसरयुक्त 17 पोते, प्रत्येक पोत्यामध्ये प्रत्येक 27 गुटखा पॅकेट, शासन प्रतिबंधित असलेला नजर प्रमिअम गुटख्याचे 3 पोते प्रत्येकी पोत्यात 55 पॅकेज, राजनिवास पानमसालाचे 2 पोते प्रत्येक पोत्यामध्ये 17 पॅकेज, रोकडा गोल्ड पानमसालाचे 4 पोते प्रत्येक पोत्यात 60 पॅकेट, हॉट पानमसाला 13 पॅकेट, एच-2 तंबाखुचे 26 पॅकेट, एन.पी.01 चे 51 पॅकेट, व्ही-1-10 पॅकेट प्रत्येक पॅकेट मध्ये 9 पुडे, विमल पानमसाला व तंबाखुचे 10 पॅकेट प्रत्येक पॅकेटमध्ये 10 पुडे, 500 नावाची तंबाखुचे 60 पुडे, वाह पानमसालाचे 20 पुडे व तंबाखुचे 20 पुडे, राजनिवास 10 पुडे 18 तंबाखुचे पुडे, सागन पानमसाला 04 खुले पॅकेट, रोकडा पानमसालाचे 7 खुले पॅकेट, गुलाम पानमसालाचे 20 खुले पॅकेट, डायमंड पानमसालाचे 5 खुले पॅकेट, योगी सुपारी 3 पुडे, चुटकी सुपारी 03, पान बहारचे 38 पुडे, बाबा तंबाखुचे 18 डब्बे, गोवा
गुटखा 60 पुडे , नजर प्रिमिअम गुटखाचे 12 खुले पुडे, करमचंद पानमसालाचे 2 पुडे असा अंदाजे 2,लाख रूपयांचा माल मिळाल्यामुळे पंचासमक्ष पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेऊन गुटखा मालाची तपासणी करून संबंधित इसमाविरूद्ध फिर्याद दाखल करण्याकरिता अन्न औषध प्रशासन विभाग अधिकारी , बुलडाणा यांचेशी संपर्क साधला असल्याचे त्यांनी सांगितले आहे .