Home मराठवाडा लग्न लावून का देत नाही म्हणून आई वडिलांवर मुलाने केला चाकू हल्ला

लग्न लावून का देत नाही म्हणून आई वडिलांवर मुलाने केला चाकू हल्ला

143

दोघे डॉक्टर दाम्पती गंभीर

अमीन शाह

नांदेड , दि. १७ :- माझे लग्न का करीत नाहीत या कारणावरून पुत्रानेच डॉक्टर पिता व मातेवर चाकूहल्ला केल्याची घटना दुपारी विवेकनगर येथे घडली.या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून भाग्यनगर पोलिसांनी पुत्रा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विवेक नगर येथील रहिवासी डॉ.संजय लाटकर व त्यांची पत्नि दुपारी 4 वाजताच्या सुमारास घरी असताना त्यांचा मुलगा वल्लभ लाटकर याने आईला तू माझे लग्न का करून देत नाहीस असे म्हणून वाद घातला. यावेळी मुलाने भाजी कापण्याच्या चाकूने पिता व मातेवर चाकूने हल्ला करून जखमी केले. याप्रकरणी डॉ.संजय लाटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.