Home विदर्भ अखेर त्या वक्तव्य प्रकरणी इंदुरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली

अखेर त्या वक्तव्य प्रकरणी इंदुरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली

193

विनोद पत्रे

“सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तारखेला स्त्री संग केला तर मुलगी होते,” या वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या इंदुरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
आपल्या वाक्यांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं, एक पत्रक काढून इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं आहे.
याआधी मात्र इंदोरीकर महाराज यांनी वेगळंच स्पष्टीकरण दिलं होतं.
“दोन तासांच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. भागवत, ज्ञानेश्वरी सगळीकडे ते नमूद केलं आहे. पण या वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस वाट बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन,”

असं स्पष्टीकरण इंदुरीकरांनी दिलं होतं.

इंदुरीकरांच्या वक्तव्याचं त्यांच्या पाठीराख्यांनी समर्थन केलं आहे, तर अनेक महिला राजकीय नेत्यांनी याविषयी प्रतिक्रिया दिल्या होत्या. आज अखेर महाराज यांनी या प्रकरणी दिलगिरी वयकत केली आहे ,