Home जळगाव कर्जोद जि.प.उर्दू शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

कर्जोद जि.प.उर्दू शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

676

रावेर (शरीफ शेख)

तालुक्यातील कर्जोद येथील जि. प. उर्दू शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रथमच सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील उपजत कलगुणांची त्यांनाच नव्याने ओळख होण्यासाठी आणि त्यांच्यात स्नेह, समर्पण व एकीची भावना वाढीस लागावी. शहरी भागापेक्षा कमी संधी ही ग्रामीण भागात उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी या संधीचं जास्तीत जास्त सोने करावं, यासाठी येथील अवघ्या सहा सात महिन्या पूर्वी आलेले या शिक्षकांनी या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुराण शरीफची तीलावत पठण करण्यात आली तयानंतर नात ए पाक पठण करण्यात आले आणि मुख्य कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत-सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील सरपंच सकीना अकबर तडवी ह्या होत्या तर उदघाटन सामाजिक कार्यकर्ते मनोज अरविंद पाठक यांनी केले दीपप्रज्वलन सौ भागयश्री पाठक , नूतन मैडम, राजू तडवी शफीउद्दीन शेकख, हाजी सरफराज शेख,आसिफ शेख जमील शेख यांनी केले .

पालक प्रेक्षकमंत्रमुग्ध
इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या १३० विद्यार्थ्यांकडून संस्कुर्तिक व नात गायनासह, जातीय सलोखा, कौमी एकता, सादरीकरण करीत
कार्यक्रमात रब्बे कौंनैन मेरे दिल की दुआ ए सूनले, खवाजा तेरी बस्ती मे रहमत बरस्ती, माँ बाप बडे अनमोल हे , तसेच हिंदू मुस्लिम एकता, जातीय सलोख्यावर गीत , स्कूल चले हम, पर्यावरण वाचवा नाटक, मूक नाटक, दारूबंदी नाटक असे विविध गाणी व नाटीका विद्यार्थ्यांनी सादर करून त्यांच्या कलाविष्काराचे दर्शन उपस्थितांना घडविले, उपस्थित पाहुणे व पालक यांनी बक्षिसाचा वर्षाव करून चिमुकल्यांना प्रोत्साहित केले.

तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रावेर उर्दू केंद्र प्रमुख कमाल शेख, गजाला तबस्सुम शेख, इरफान शेख,मगावाचे सरपंच , उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती उपअध्यक्ष आरिफ शेख, सदस्य अल्ताफ शेख आसिफ मेम्बर यांनी मेहेनत घेतली.

या कार्यक्रमात सिरतुलनबी या विषयावर भाषण झाली त्यात पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्या भाषणचे जज्ज म्हणून अनिस मलीक, सईद शेख,अखतर शेख,इरफान खान यांनी काम पाहिले.

यांची होती उस्थिती

साजिद शेख, हाजी अ सत्तार , हाजी गफ्फार, ताजु उस्ताद, अश्फाक शेख, रईस भाई, राजू अरमान, अकिल शेख, नईम साथी, अ साजिद

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यध्यपक रईस शेख यांनी तर सुत्रसंचालन शाफिक शेख यांनी व आभार हानीफ जनाब व जावेद जनाब यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याधपक व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. शेवटी राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.