Home विदर्भ क्रांतीकारक सेवालाल महाराज यांची देवळी येथे जयंती उत्साहात.!

क्रांतीकारक सेवालाल महाराज यांची देवळी येथे जयंती उत्साहात.!

129

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १८ :- जिल्ह्यातील देवळी येथे क्रांतिकारक सेवालाल महाराज यांची 281 वी जयंती गोरसेना गोरसीकवाड़ी च्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

प्रमुख पाहुने म्हणून पवन भाऊ महाजन उपस्थित होते.यावेळी बंजारा समाजाच्या परंपरे नुसार बंजारा समाजाचे दैवत क्रांतिकारक सेवालाल महाराज व मा.मुख्यमंत्री वसंतराव नाइक यांच्या प्रतिमीचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली, व बंजारा परंपरेनुसार बंजारा भाषेतील भजन करण्यासाठी मा.दिलीप महाराज रा.चांदूर रेल्वे यांना बोलविन्यात आले होते, त्यानंतर प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित असलेले गोरसेना तालुका अध्यक्ष पुसद येथील विट्ठल चव्हाण यांनी देवळीतील समाज बांधवांना अत्यंत चांगले मार्गदर्शन केले व एकत्रित येन्याचा मार्ग दाखविला,त्यानंतर देवळी शहरामध्ये सेवालाल महाराज चा नारा देत भव्य मिरवनुक सुद्धा काढ़न्यात आली, बंजारा भाषेतील गीत व नृत्य या मिरवनुकी मध्ये दिसुन आले.कार्यक्रमाचे आयोजक सुधाकर चव्हाण,सुरेश राठोड,सुखदेव राठोड व गोरसेना पधादिकारी गजानन पालते,भीकाजी आड़े, शुभम राठोड,अरविंद रुनवाळ,विलास राठोड,योगेश जाधव,प्रवीण मुडे,दिनेश पालते,अशोक राठोड,विश्वास पालते,प्रताप जाधव,प्रणय राठोड,आकाश राठोड,मनोज राठोड,व इत्यादि गोरसेना पधादीकारिंनी मोठ्या उत्साहात सहकार्य केले.