Home सातारा जिल्हा परिषदेच्या शाळेतच खरी गुणवत्ता आहे – रेखाताई घार्गे

जिल्हा परिषदेच्या शाळेतच खरी गुणवत्ता आहे – रेखाताई घार्गे

163

मायणी. ता.खटाव. जि.सातारा (सतीश डोंगरे )
आजचे आनंददायी शिक्षण आणि शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या प्रती असलेली तळमळ यामुळेच जिल्हा परिषदांच्या शाळांची गुणात्मकता देशपातळीवर चमकताना दिसते आहे”

असे प्रतिपादन खटाव पंचायत समितीच्या सभापती रेखाताई घाडगे यांनी केले पाचवड केंद्र समूहाच्या मेळाव्याच्या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रप्रमुख मोहन साळुंखे पाचवड चे सरपंच काकासाहेब घाडगे, शिक्षक बँकेचे संचालक चंद्रकांत मोरे ,शिवाजी घाडगे , शिक्षक समितीचेअध्यक्ष अर्जुन यमगर ,माजी अद्यक्ष सागर माने ,शशिकांत बागल ,शिवाजी खाडे ,आबासाहेब जाधव, नवनाथ खरमाटे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यानिमित्त विद्यार्थ्यांच्या मनोरंजनात्मक खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या .यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत लोक गीते ,देशभक्तीपर गीते सादर करून कलात्मकता दाखवली . पाचवड ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेला एलईडी व पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद महामुनी ,धनाजी साळुंखे किरण पवार,रावसाहेब चव्हाण ,रविषात्री जाधव,उमाकांत माने ,सुभाष सलगर, सुधीर खाडे ,पांडुरंग कुंभार ,बाळासाहेब बेडेकर यांनी प्रयत्न केले .किरण आहिवळे यांनी सूत्रसंचालन केले .बाळासाहेब कांबळे यांनी आभार मानले.