Home सातारा शिवरायांचे लोककल्याणकारी राज्याचे विचार आजही जगाला प्रेरणादायी – बाळासाहेब कांबळे

शिवरायांचे लोककल्याणकारी राज्याचे विचार आजही जगाला प्रेरणादायी – बाळासाहेब कांबळे

512

राज बहुउद्देशीय विकास संस्था मायणी. यांच्यावतीने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन आणि पत्रकाचे वाटप करुन शिवजयंती साजरी

सतीश डोंगरे

मायणी. ता.खटाव जि.सातारा राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्या संकल्पनेतील लोककल्याणकारी स्वराज्य स्थापन करून रयतेला सुखी करणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजही जगाला प्रेरणादायी आहे .असे प्रतिपादन लेखक बाळासाहेब कांबळे यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले . राज बहुउद्देशीय विकास संस्था मायणी. यांच्यावतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाराम कचरे, सचिव पप्पू कचरे,उपध्यक्ष सतीश डोंगरे ,जेष्ठ पत्रकार पांडुरंग तारळेकर ,सल्लागार पत्रकार दिलीप पुस्तके, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, समीर नदाफ, भोला खिलारे ,नंदकुमार कांबळे,शैलेश भिसे, इकबाल नदाफ पोलीस मित्र संघाचे विशाल चव्हाण, सुशांत जाधव,तानाजी (नाना) चव्हाण ,दाऊद भाई मुल्ला ,आदी मान्यवर उपस्थित होते .
पुढे श्री कांबळे म्हणाले ,”शिवरायांच्या संकल्पनेतील स्वराज्याची निर्मिती ही सामान्य जनतेच्या सुखासाठी होती .त्यासाठी उभारलेली उत्पादन साधने, पाणीपुरवठ्याच्या योजना ,न्यायव्यवस्था ,सुरक्षा व्यवस्था,तटबंदी याबाबतच्या गोष्टी आजही प्रेरणादायीअसून आणखी हजारो वर्ष मार्गदर्शनक ठरणार आहेत .तरुणांनी या युगपुरुषाचे विचार आत्मसातकेले तर निश्चितच समृदध भारताची उभारणी होईल . यावेळी संस्थेच्या वतीने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन आणि पत्रकाचे वाटप करण्यात आले व त्यावेळी अमोल भिसे,गणीभाई बागवान संस्थेचे पदाधिकारी संतोष लुगडे,उपस्थित होते. तानाजी चव्हाण यांनी उपस्थित मान्यवर यांचे आभार मानले.