पत्नीचा खून करणाऱ्या पती ची ही आत्महत्या
अमीन शाह / अब्दुल कय्युम
औरंंगाबाद , दि. २० :- स्वयंपाक न केल्याच्या कारणावरून पत्नीचा निर्घुणपणे खून करून पसार झालेल्या पतीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना वुंâभेफळ शिवारात घडली असल्याची माहिती चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली.
स्वयंपाक न केल्याच्या कारणावरून जयश्री राम काळे (वय २५, रा.अरूणोदय कॉलनी, देवळाई परिसर) या महिलेचा सेंन्ट्रीगच्या हातोड्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती.
जयश्रीचा खून केल्यानंतर राम बाबुराव काळे (वय २८) हा पाच वर्षाच्या मुलाला घेवून पसार झाला होता. दोन दिवस मुलाला सोबत फिरविल्यानंतर राम काळे याने करमाड परिसरात मुलाला सोडून धुम ठोकली होती. बुधवारी दुपारी राम काळे याचा मृतदेह कुभेफळ शिवारात गळफास घेतलेल्या आवस्थेत मिळून आला. पोलिसांनी राम काळे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात हलविला असून या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.