Home सातारा आदर्श शिक्षक रत्न पुरस्काराने बाळासाहेब कांबळे सन्मानित

आदर्श शिक्षक रत्न पुरस्काराने बाळासाहेब कांबळे सन्मानित

188

मायणी. ता.खटाव. जि.सातारा (सतीश डोंगरे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानकात्रे येथील उपशिक्षक बाळासाहेब गोपाळ कांबळे यांना जिल्हास्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले . शाल ,सन्मानचिन्ह ,पुस्तक व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते, बहुजन शिक्षक संघ सातारा यांच्यावतीने वेणूताई चव्हाण सभाग्रह कराड येथे संयुक्त जयंती उत्सव व शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मा मानसिंगराव जगदाळे कराडचे सभापती प्रणव ताटे, माजी सभापती शालन माळी,बहुजन शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण लादे ,सचिव उदय भंडारे ,पोलीस उपनिरीक्षक विजय भापकर,प्रमुख वक्ते विजय काळे इत्यादी मान्यवर होते उपस्थित होते.
मायणी गावचे सुपुत्र श्री .कांबळे यांच्या शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले . शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना बाळासाहेब कांबळे यांनी दुर्गम अशा जावळी तालुक्यात आरंभीची सेवा केली .यानंतर खटाव तालुक्यात शैक्षणिक कार्य करत असताना यामध्ये लोकवर्गणीतून डिजिटल वर्ग, शिष्यवृत्ती परीक्षा, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थी घडवण्याचे काम केले . याबरोबर अनेक कथा ,कवितांचे लेखन केले आहे .म.जोतीराव फुले, रमाई चरित्र ,असे घडले महापुरुष इ .पुस्तकांचे त्यांनी लेखन केले असून ,रमाई चरित्र हे पुस्तक ‘कन्नड ‘भाषेत अनुवादित झाले आहे . बहुजन शिक्षक संघाचे कराड,पाटण केडर सदस्य ,शिक्षक, विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचे सूत्रबद्ध नियोजन केले . गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पिसे, विस्ताराधिकारी सुजाता जाधव ,केंद्र प्रमुख मोहन साळुंखे ,राज बहु उद्देशीय संस्था मायणी ,डॉ .बी एन कर्पे, प्राचार्या .शर्मिष्ठा आंबवडे ,समूह पाचवड, , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई सातारा जिल्हा, खटाव तालुका इ नी त्यांचेअभिनंदन केले.