Home पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण पञकारांनो लक्ष्यात घ्या…

ग्रामीण पञकारांनो लक्ष्यात घ्या…

188

नाशिक , दि. २१ :- ग्रामीण भागातील सामान्य पत्रकारांनो आज गुरुजींवर ही वेळ उद्या तुमच्यावरही ही वेळ येईल लक्ष्यात घ्या..
इथं केवळ समाजासाठी राबायचे कित्येकांना मोठं करायचं सहाययभूत व्हायचं मात्र स्वतः संकटात किंवा आजारी पडल्यावर मात्र अडचणीत यायचं व वंचित राहायचं..
नुसते पद मिरवू नका निष्क्रिय संघटनेत राहू नका , स्वतःच्या कुटुंबाचा , उद्याच्या भविष्याचा , कष्टाच्या मोबदल्याचा विचार करा असे कित्येक पत्रकार मातीत गेले.
उद्या हीच वेळ तुमच्यावरही येऊ शकते थोडा विचार करा.
३५ वर्षे गोरगरिबांसाठी झटणारे पत्रकार
ज्यांनी धरणे वाचवली , जलसंपदा विभाग बाहेर जाऊ दिला नाही , शेतकरी आत्महत्याग्रस्त निराधार परिवाराना मदत केली व नाशिक तालुका पत्रकार संघटनेचे निर्मितीत ते पुढे होते. कित्येक पत्रकारांच्या हक्क अधिकारासाठी भोर गुरुजी सात्यत्याने पुढे असतात तर ग्रामीण विकासासाठी झटणारे,
धरणग्रस्तांसाठी झटणारे सुरेश भोर ( महाराज ) गुरुजी ८ दिवस अजाराने दवाखान्यात ऍडमिट आहे ते कित्येकांचे आधार बनले मात्र त्यांच्यासाठी त्या – त्या अनेकांना वेळ नाही.
एखादा मोठ्या असामीचा व्यक्ती आजारी असता तर अश्या व्यक्तीसाठी राजकिय सामाजिक , पत्रकार संघटनांची रीघ लागली असती??
आम्ही त्यांची शुश्रूषा करतोय मात्र समाजात अनेकांचे आधार असलेल्या गुरुजींसाठी फार कोणीय पुढं आलं नाही.
मात्र ८ दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर सुरेश भोर गुरुजींचा आजाराबद्दल स्टेटस टाकले मात्र दुर्दैव सामान्य पत्रकारांचे….
ते सतत एकटे असतात , पत्रकारांनो प्रसंग आल्यावर तुमचे कोणीय नसत आणि तुम्ही ज्यांना मोठं केलं ज्या अधिकारी व नेत्यांना मार्गदर्शन केलं , सामाजिक चळवळी व केवळ पत्रकार दिनाला सत्कार करण्यास उगवणाऱ्या संघटना ज्यांच्या हक्कांसाठी लिहिलं दाखवलं ते सगळे तुमचे किती असतात?
हे सवाल तुमचे तुम्हीच स्वतःला करा
ग्रामीण / शहरी सामान्य पत्रकारांनो तुम्ही केवळ राबायचे , तुमची नोंद होत नाही ना कष्टाची कदर मग आपला मार्ग योग्य का?
हे हि स्वतःला विचारा आपल्यातील नोकरदार त्यांचे बरे मात्र आपले काय?भिकेला लागायचे का?
हाही सवाल स्वतःला करा हक्कासाठी लढा
गप्प बसून खोटी पदे मिळवून हाती काही लागणार नाही.
हेच सत्य आहे तुमची कदर ना सरकारला ना तुमच्या जवळच्या माणसांना असे अनुभव येऊ शकतील???

आपला-

श्री.राम खुर्दळ

राज्य उपाध्यक्ष

पत्रकार संरक्षण समिती , महाराष्ट्र