सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. २२ :- जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील श्री बी के समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रकार्य अंतर्गत इसापूर येथे नेत्रतपासणी शिबिर आयोजित केले होते. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य सुनील सुर्वे यांनी गावातील लोकांना नेत्राचे महत्व आणि डोळे शरीराचा अवयव आहे व अतिशय संवेदनशील अवयव असून त्याला प्रकाशाची जाणीव होते. डोळ्याचा उपयोग वस्तूचे रंगरूप पाहण्यासाठी होतो, डोळा हा खूप महत्त्वाचा अवयव आहे. कारण डोळे नसले तर आपण काहीच पाहू शकत नाही डोळे हे खूप नाजूक असतात त्याची काळजी घेणे आवश्यक असते, असे मार्गदर्शन गावातील लोकांना केले हेल्पिंग हॅन्ड मल्टीपर्पज सोसायटी अमरावती यांची टीम आलेली होती. डॉक्टर विजय खडसे , राजीव पाटील, बंटी भाऊ नाईक यांनी नेत्राची तपासणी करून अल्प दरामध्ये चष्मा उपलब्ध करून दिला या शिबिरचा लाभ गावातील दहा वर्षावरील मुले, तरुण, प्रौढ, वयोवृद्ध , महिला व इतर गावातील मंडळींनी नेत्र शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराला गावाच्या सरपंच प्रणिताताई आंबटकर , उपसरपंच नितिन करपती, पोलीस पाटील रमेश ढोकणे, पत्रकार नरेश ढोकणे, राजूभाऊ करपती तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक अंकित गिरमकर, प्राध्यापिका आरती तुंबडे व कार्यक्रमाचे आयोजन करणारे विद्यार्थी निलेश दारुंडे, तृप्ती अमृतकर, अभय चौधरी, शुभम होरे, लोचना पाचपोर, रवीना येरमे, अमोल काकडे, अक्षय गणवीर, प्रणय वासेकर, विशाल गायकवाड, सचिन ठाकरे, सागर डगवर, प्रीतम लोहे हे सर्व विद्यार्थी उपस्थित होते व गावकरी सुद्धा या शिबिरात उपस्थित होते.