Home महत्वाची बातमी मराठा लाईट एन्फेंट्रीचे जवान भूषण दानडेकर यांचे निधन.!

मराठा लाईट एन्फेंट्रीचे जवान भूषण दानडेकर यांचे निधन.!

139

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. २२ :- जिल्ह्यातील खरांगणा मोरांगणा येथील सुपुत्र मराठा लाईट एन्फेंट्री चे जवान भूषण दानडेकर कुपवाडा येथे सरावादरम्यान मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले होते तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भूषण दांडेकर यांचा दीड वर्षाच्या आधी विवाह झाला होता. आणि नुकतेच त्यांना जुळे अपत्य झाले. भूषण दांडेकर यांचे मृत्यू बाबत सविस्तर अधिकृत माहिती अजून आलेली नाही उद्या त्यांचे पार्थिव शरीर त्यांचे मूळगाव खरांगणा मोरांगणा येथे आल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती ठाणेदार गायकवाड यांनी दिली.