Home मराठवाडा महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाचे नांदेड येथे शिक्षण परिषद आणि राज्यस्तरीय अधिवेशन

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाचे नांदेड येथे शिक्षण परिषद आणि राज्यस्तरीय अधिवेशन

134

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि. २२ :- महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने नांदेड येथे येत्या 24, 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी शिक्षण परिषद, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आणि राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे .अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
परिषदेचे उद्घाटन दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शुभारंभ मंगल कार्यालय लेबर कॉलनी नांदेड येथे होणार असून . उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार यावेळी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष दिनकरराव हनुमंते हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा निमंत्रक शंकराव कांबळे उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री नितीन राऊत, शालेय मंत्री वर्षा गायकवाड ,गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख , सामाजिक न्याय तथा समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण पाणीपुरवठामंत्री संजय बनसोडे, खासदार हेमंत पाटील,नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, आ. मोहन हंबर्डे ,आ. बालाजीराव कल्याणकर, आ. बळवंत वानखेडे , उपाध्यक्ष सौ पद्मा सतपलवर , शिक्षण सभापती संजय बेळगे, विषय समिती सभापती बाळासाहेब रावणगावकर , समाजकल्याण सभापती एडवोकेट रामराव नाईक, महिला बालकल्याण सभापती सुशिलाबाई हनुमंतराव बेटमोगरेकर ,माजी नगरसेवक सुभाष रायबोले, इंजिनीयर प्रशांत ठमके, विनोद भरणे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे .
शिक्षण परिषदेच्या दुसऱ्या दिवशी दिनांक २५ रोजी शिक्षण परिषद व सावित्रीबाई फुले आदर्श शाळा जिल्हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत . यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे उपस्थित राहणार असून यावेळी ‘ शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता निर्माणात शिक्षक पालक आणि प्रशासनाची भूमिका ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या शिक्षण परिषदेचे उद्घाटन मा अशोक काकडे (भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे ,प्राचार्य डॉक्टर जयश्री आठवले, शिक्षणाधिकारी बालासाहेब कुंडगिर ,शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, अधिव्याख्याता डॉ. प्रवीण कुमार पाईकराव ,चंद्रकांत धुमाळ यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून शंकरराव कांबळे असून दिनकरराव हनुमंते राज्याध्यक्ष बहुजन शिक्षक महासंघ यांचे अध्यक्षतेखाली ही शिक्षण परिषद होणार आहे
दिनांक २५ रोजी खुले अधिवेशन शंकरराव कांबळे यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी दिनकर हनुमंते राज्याध्यक्ष ,गौतम टाकळीकर ,महेंद्र भगत, मधुकर वारभुवन यांची उपस्थिती राहणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या शिक्षण परिषदेत अनेक बाबींवर अति महत्वपूर्ण चर्चा होणार असून शिक्षकांच्या समस्या, उपाययोजना आणि भविष्यातील ध्येयधोरणे उद्दिष्ट आणि त्यासाठी आवश्यक आंदोलनाची दिशाही या परिषदेत ठरविण्यात येणार असल्याने राज्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिक्षण परिषदेस आणि राज्यस्तरीय अधिवेशनास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना शासन नियमाप्रमाणे रजा मंजूर होणार असल्याचेही शिक्षण परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.