देऊळगाव राजा : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास मांडला गेला हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव असून माँसाहेब जिजाऊंनी महाराजांना स्वराज्य निर्मिती चे धडे दिले आणि त्यांच्याच प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती, शेतकरी, आणि बहुजनांच्या रक्षणासाठी आपले आयुष्य खर्ची केले असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आदिल पठाण यांनी सिनगाव जहागीर येथे शिवजयंतीनिमित्त व्यक्त केले.
तालुक्यातील सिनगाव जहागीर येथील राजश्री शाहू सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक सकाळचे तालुका बातमीदार मुशीर खान कोटकर होते प्रमुख वक्ते म्हणून बोलत असताना आदिल पठाण म्हणाले शिवाजी महाराज कोण्या जाती-धर्म विरुद्ध कधीच नव्हते अफझलखान खान,शाहिस्ताखान यांच्याविरुद्ध ची लढाई स्वराज्य स्थापनेसाठी होती महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य सर्वधर्म जातींसाठी निर्माण केली गेले शिवाजी महाराजांच्या राज्यात त्यांची प्रजा सुख समाधानाने नांदली त्यांनी सर्वांसाठी समान न्याय व्यवस्था निर्माण केली होती न्याय करताना कधीही भेदभाव केला नाही शिवरायांचे अंगरक्षका मध्ये मुस्लिम सैन्य होते प्रमुख जबाबदाऱ्या मुस्लिम सैन्या कडे होती मात्र हा इतिहासात नोंद असलेल्या या वास्तवाला लपवण्यात आले अफझल खानचा वध शिवाजी महाराजांनी तो मुस्लिम होता म्हणून केला नव्हे तर स्वराज्य विरोधी राजकीय विरोधक होता आणि त्याने महाराजांवर चाल केली होती म्हणून त्याचा वध केला या घटनेची पार्श्वभूमी मांडताना इतिहासकारांनी महाराजावर चाल करून त्यांच्या कपाळावर तलवारीचा वार करणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णी सांगितलं नाही याबाबतचा सविस्तर इतिहास श्री पठाण यांनी उपस्थितांसमोर मांडला कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजय पवार यांनी केले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुशीरखान कोटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी खरा इतिहास वाचून युवकांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेणे गरजेचे असल्याचे सांगितले शिवाजी महाराज सर्वधर्म जातीच्या लोकांचे आहे त्यांना जातीच्या चौकटीत बघणे योग्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले याप्रसंगी सुनील डोईफोडे जालिंदर मांदळे भीमराव उबाळे सचिन बंगाळे प्रमोद बंगाळे बाजीराव नाना वाघ गणेश पवार विजय बंगाळे अनिल पवार अमोल पवार विलास बंगाळे संतोष कापडी बंडू शिवणकर गजानन बोबडे ज्ञानेश्वर डोईफोडे अमोल उबाळे संतोष साबळे सोनू बंगाळे बद्री नागरे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे संचालक भगवान मुंढे यांनी पुढाकार घेतला.