Home मराठवाडा गुटखा विक्रेत्यांवर कार्यवाही एक लाख 75 हजार चा मुद्देमाल जप्त

गुटखा विक्रेत्यांवर कार्यवाही एक लाख 75 हजार चा मुद्देमाल जप्त

185

खुलेआम गुटख्याची विक्री

सय्यद नजाकत – बदनापूर

जालना , दि. २३ :- शासनाने बंदी घातलेली असतांना देखील शहरासह तालुक्यात अवैधरित्या विविध कंपन्यांचा गुटका सर्रास विक्री केला जात असून औषध अन्न प्रशासन याकडे सोयीस्कर दृलक्ष करीत असल्याने गुटका माफियांना सुगीचे दिवस आलेले असून तालुक्यातील कस्तुरबाडी येथे एका घरामध्ये लाखो रुपयांचा गुटखा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने बदनापूर पोलिसांनी सापळा रचून एक लाख 25 हजाराच्या गुटका व मोटार सायकल असा 1 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले असल्याने गुटखा विक्रेत्यामध्ये खळबळ माजून शहरातील सर्वच विक्रेत्यांनी टपऱ्या बंद करून पळ काढला

शासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध कंपन्यांच्या गुटखा विक्रीवर बंदी आणलेली आहे मात्र बदनापूर शहरासह तालुक्यात सर्रास गोवा,माणिकचंद आदी गुटख्याची विक्री केली जात आहे ,प्रत्येक टपऱ्यांवर विविध कंपनीच्या गुटख्याची विक्री केली जात असताना औषध अन्न प्रशासन विभाग मात्र सोयीस्कर पणे कानाडोळा करीत असल्याने गुटखा माफिया राजरोसपणे विक्री करीत आहे,शहरासह तालुक्यात विक्री होत असताना अनेकवेळा पोलीस प्रशासनाने कारवाई केली मात्र शहरात येणारा माल कोणत्या व्यापार्यांकडून येतो त्या व्यापर्यपर्यंत पोलीस तपासात कारवाई झालेली नाही या मागचे गुपित काय असा प्रश्न निर्माण होत आहे

23 फेब्रुवारी रोजी शहरातील शंकर नगर भागात कस्तुरवाडी येथील एक व्यक्ती काही किरकोळ दुकानदारांना गुटखा विक्री करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांना मिळाली असता सकाळी 11 वाजता पोलीस निरीक्षक मारुती खेडकर ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख इब्राहिम,प्रेमदास वनारसे, शेख इस्माईल,करणसिंग जारवाल,चरणसिंग ब्राह्मवत,महिला पोलीस कर्मचारी पूजा वडगुजर यांनी सापडा रचून शंकरनगर मध्ये जनार्धन रामकीसन नेमाने यास मोटारसायकल सह ताब्यात घेऊन चौकशी केली असता पिशवी मध्ये गोवा गुटख्याचे पुढे आढळून आले असता घटनास्थळ पंचनामा करून पोलीस ठाण्यात आणले

आरोपीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवितात आरोपी नेमाने याने तालुक्यातील कस्तुरवाडी येथील घरी माल असल्याची कबुली दिली असता पोलिसांनी आरोपीस सोबत घेऊन कस्तुरवाडी गाठले असता घरात गुटखचयांचे 12 पोते आढळून आल्याने सदर माल ताब्यात घेऊन पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून तब्बल 1 लाख 25 हजाराचा गुटखा व 50 हजार किमतीची मोटारसायकल असा 1 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून बदनापूर पोलिसांची मोठी कारवाई झाली या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले

बदनापूर तालुक्यातील कस्तुरवाडी येथे कित्येक दिवसापासून अवैध गुटखा विक्री केला जात होता परन्तु कोणतीच कारवाही होत नव्हती

राज्यचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवैध गुटखा विक्री करणाऱ्या गुटखा माफियावर मोक्का अंतर्गत कारवाही करण्यात यावी असे आदेश दिल्यानंतर पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन खळबळून जागे झाले आणि बदनापूर तालुक्यातील जेमतेम 1500 लोकवस्ती असलेल्या कस्तुरवाडी या छोट्या गावात लाखोंच्या घरात गुटखा आढळून येतो आणि पोलीस प्रशासन ने या पूर्वी कोणतीच कारवाही करत नाही हे कोडे मात्र अनुउत्तरीत आहे

परंतु आजच्या या करवाहिने पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडली

शासनाची बंदी असताना देखील तालुक्यात सर्रास गुटखा विक्री केली जात असल्याचे पोलीस कारवाईतून सिद्ध झाले आहे परंतु हा माल कोणत्या व्यापार्यांकडून पुरविला जातो हे तपासातून निष्पन्न होणे अत्यन्त गरजेचे असून मूळ व्यापाऱ्याला मुख्य आरोपी केल्यास या अवैध विक्रीला लगाम लावण्यात काही प्रमाणात यश येऊ शकते मात्र नेहमी पोलीस केवळ विक्री करणाऱ्या वर कारवाई करून मोकळे होतात हे कटू सत्य आहे

बदनापूर शहरासह तालुक्यात अवैधरित्या गुटखा साठा मोठ्या प्रमाणात साठवलेला असून या प्रकरणात पोलीस व औषध प्रशासनाने सखोल चौकशी करून जनतेच्या आरोग्याला घातक असलेल्या गुटखा नष्ट करावा अशी आशा सर्व सामन्याची आहे मात्र पोलिसांनी 11 ते 2 या वेळेत 1 लाख 25 हजाराचा गुटखा जप्त करून पुढील कारवाईसाठी औषध अन्न प्रशासनास कळवून देखील संबंधित अधिकारी रात्री उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात आले नाही हे विशेष