Home बुलडाणा विद्यार्थीनीने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

विद्यार्थीनीने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

159

दुःखद घटना…!

अमीन शाह

बुलडाणा , दि. २३ :- १९ वर्षीय विद्यार्थीनी गावालगतच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना भरोसा येथे आज
उघडकीस आली.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या भरोसा येथील श्रीकृष्ण विठोबा जाधव यांची बहीण गावात घराशेजारी राहत असे सौ. अलका नाना पैठणे यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे लग्न होवून ती तिच्या सासरी राहते आणि लहान मुलगी नामे कु. जयश्री उर्फ बारकी नाना पैठणे वय १९ वर्ष बी.ए. प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. २२ फेब्रुवारी रोजी कु. जयश्री ही पाणी भरण्यासाठी नळावर भांडे घेवून गेली परंतु सायंकाळ झाली तरी घरी परत आली नाही. म्हणून संदीप जाधव, एकनाथे पैठणे, देवानंद पैठणे सर्वांनी शोध घेणे सुरू केले असता जयश्रीचे प्रेत गावालगतच्या विहिरीत आढळून आले. या घटनेची माहिती श्रीकृष्ण विठोबा जाधव यांनी पोस्टेला दिली. माहिती मिळताच तात्काळ ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ पंजाबराव साखरे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व पोस्टेला मर्ग दाखल केला. गावात घडलेल्या घटने मुळे हळहळ वयकत केली जात आहे , बातमी हिलोस्तर आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.