रावेर (शरीफ शेख)
जळगाव , दि. २४ :- पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरी प्रकरणातील गुन्ह्यात अल्पवयीन चोरट्याचा शोध सुरु असतांना तीन वर्षापासून फरार या अल्पवयीन चोरट्याचा बाप गोकुळ हंसराज राठोड, रा-सुप्रिम कॉलनी, ह.मु.उरण,ता.जि.ठाणे यास पोलिसांनी शहरातून अटक केली आहे. राठोड याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने २०१७ मध्ये एमआयडीसीतील दोन कंपन्यांमध्ये चोरी करुन चनादाळ तसेच बारदानच्या गोण्या चोरी केल्या होत्या. साथीदार मोहम्मद अब्दूल रज्जाक शेख यास अटक करण्यात आली होती. मात्र गोकूळ राठोड हा फरार होता. राठोड हा रविवारी त्याच्या जळगावातील शालक याच्या घरी असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी गुन्हे शोध पथकातील कर्मचारी इम्रान सय्यद यांना मिळताच पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक गोविंद पाटील, मुदस्सर काझी, सतीश गरजे असे पथकांनी सुप्रीम कॉलनी परिसरातील सापळा लावून गोकुळ हंसराज राठोड यास सुप्रिम कॉलनी येथुन त्याच्या शालकाच्या घरातुन ताब्यात घेतले असून पुढील तपास स,फौ. अतुल वंजारी करीत आहे. गोकुळ हंसराज राठोड च्या विरोधात एमआयडीसी पो स्ट ला अनेक गुन्हे दाखल आहे, जळगांव जिल्हा पोलीस दल मोस्ट वॉन्टेड यादीत देखील नाव आहे.