Home महत्वाची बातमी बासष्ट वर्षाच्या वृद्धाने अल्पवयीन बालकासोबत केले अनैसर्गिक कृत्य.!

बासष्ट वर्षाच्या वृद्धाने अल्पवयीन बालकासोबत केले अनैसर्गिक कृत्य.!

136

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. २४ :- जिल्ह्यातील सेलु येथील जोशी नगरात एका किराणा दुकानदाराने दु कानात आलेल्या एका सहा वर्षीय अल्पवयीन बालकासोबत दुपारचे सुमारास अनैसर्गिक कृत्य केल्याच्या तक्रारीवरून किराणा दुकांदारावर विविध कलमासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सेलू येथील जोशी नगर येथील दुकानदार जगन श्रीपत इंगळे वय 62 याने दुकानात चाकलेट घेण्यास आलेल्या एका अल्पवयीन मुलास टकाटक चे लालच देऊन घरातील आतल्या खोलीत नेले व तेथे बेड वर उताणे झोपवून अनैसर्गिक कृत्य केले.घरी आल्यानंतर आईने विचारले की तूला दोन रुपये दिले होते मग हा पाच रुपये किमतीचा टकाटक तूझे कडे आला कसा. विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता घडलेला प्रकार मुलाने आईला सांगितल्या नंतर घटनेची तक्रार सेलू पोलिसात नोंदविण्यात आली.तक्रारीवरून सेलू पोलिसांनी आरोपी जगन श्रीपत इंगळे याला अटक करून भा द वि च्या 377 भा.द.वी. R/W 6,10,13 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार निलेश गाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक सौरभ घरडे पुढील तपास करीत आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस उप अधिक्षक पियुष जगताप यांनी सेलु पो.स्टे. ला भेट दिली.