Home विदर्भ रेती भरलेला ट्रक पलटि होवुन दबुन दोन जागीच ठार

रेती भरलेला ट्रक पलटि होवुन दबुन दोन जागीच ठार

137

नागपुर अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटातील घटना.

वर्धा / तळेगांव (शा.पं.) :- येथील नागपुर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटात नागपुर कडुन अमरावती कडे कन्हान रेती भरुन जाणारा ट्रक क्रं. MH 30 AB 4539 चा समोरील टायर फुटुन ट्रक अनियंत्रीत होवुन रोडच्या कडेला पलटि झाला. यामध्ये ट्रक ड्रायव्हर जब्बार शहा वय ५० वर्ष व क्लिनर शेख नईम ३६ वर्ष दोघेही रा. अकोला त्यामध्ये दबुन जागीच ठार झाले सदर घटना रविवारच्या पहाटे ४ वाजताचे दरम्यान घडली.

सदर घटनेची माहिती तळेगांव पोलीसांना मिळताच घटनास्थळ गाठुन जें. सी. बी. च्या साहय्याने दबलेले दोन्हि मृतदेह काढुन घटना स्थळाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासनी करीता ग्रामीन रुग्णालय आर्वी येथे पाठविण्यात आले असुन अधिकचा तपास ठानेदार रवी राठोड यांचे मार्गदर्शनात विजय उइके. संदीप महाकाळकर.मनोज आसोले हे करीत आहे. रवींद्र साखरे सह इक्बाल शेख 9890777242. 9834453404.