कॉपी मुक्त परीक्षा केंद्र चा बट्ट्याबोळ
सय्यद नजाकत – बदनापूर
जालना , दि. २५ :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्चमाध्यमिक प्रमाणपत्र मंडळामार्फत उच्चमाध्यमिक परीक्षांना सुरवात झालेली असून जिल्ह्यातील विविध केंद्रावर सर्रास कॉपी प्रकार घडत आहे तर काही केंद्रावरून थेट पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने कॉपी मुक्त परीक्षा अभियानास अपयश आल्याचे चित्र उघड झाले असून बदनापूर तालुक्यातील ढासला परीक्षा केंद्रावरील इंग्रजीच्या पेपरला घडलेला प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून बोर्डापर्यंत पोहचल्याने २४ फ़ेब्रुर्वरी रोजी भौतिक शास्त्र च्या पेपरला भरारी पथकाने तब्बल दोन तास ठाण मांडून दोन विद्यर्थ्यांना कॉपी करतांना पकडल्याने केंद्रावरील अधिकाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
१८ फेबूर्वरी पासून उच्चमध्यकीं प्रमाणोपात्र परीक्षांना सुरवात झालेली असून इंग्रजीच्या पेपरला बदनापूर तालुक्यातील ढासला,राळा हिवरा,सह जिल्ह्यातील अनेक केंद्रावर सर्रास कॉपीचे प्रकार घडले जिल्ह्यात कॉपी मुक्त परीक्षा व्हाव्यात म्हणून विविध भरारी पथक तैनात करण्यात आलेले असतांना देखील कॉपी प्रकार व पेपर फुटीचे प्रकार घडत असल्याने कॉपी मुक्त परीक्षा अभियानास यश आलेले दिसत नाही,इंग्रजीच्या पेपरला ढासला परीक्षा केंद्रावर नागरिक सर्रास परीक्षा हॉल मध्ये जाऊन कॉपी पुरवीत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन बोर्ड पर्यंत पोहचल्याने सदरील केंद्रावर भरारी पथकाची नजर पडली
२४ फेब्रुवारी रोजी भौतिक शास्त्र विषयाचा पेपर सुरु असतांना अचानक जालना जिल्ह्यतील भरारी पथक प्रमुख डॉ.प्रकाश माँटे,डॉ.सतीश सातव,आत्माराम डवणे यांच्या पथकाने ढासला परीक्षा केंद्र सकाळी १२ वाजत गाठले असता दोन विद्यर्थ्यांना कॉपी करतांना रंगेहाथ पकडून कारवाई केली तदनंतर हा पथक तब्बल २ वाजेपर्यंत केंद्रावर ठाण मांडून होते तर दुपारच्या सत्रात राज्यशास्त्र विषयाच्या पेपरला सुरवात झाली असता पुन्हा या पथकाने २ तास थांबून कॉपी मुक्त परीक्षा घेण्यास केंदावरील पर्यवेक्षकांना भाग पाडले सदर पथक तब्बल चार तास ढासला केंद्रावर ठाण मांडून बसल्याने बाहेरून कॉपी पुरविणाऱ्या मंडळींचा भ्रमनिरास झाला असून सदर केंद्र कॉपी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे हे विशेष .