Home मराठवाडा आज पासुन बोधडी पोस्ट ऑफिस मध्ये महाबचत मेळाव्याचे आयोजन – सुरेश सिंगेवार

आज पासुन बोधडी पोस्ट ऑफिस मध्ये महाबचत मेळाव्याचे आयोजन – सुरेश सिंगेवार

355

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि.२६ बोधडी येथे स.न.२०१९ व २०२० या आर्थिक वर्षा निमित्ताने मुलीच्या लग्नासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी नागरिकांनी आपले व आपल्या मुलां-मुलीचे स्वप्नन साकार करण्यासाठी खालील योजनेचा लाभ घ्यावा. इतर राष्ट्रीयकृत बँके पेक्षा किती तरी पटीने जास्त व्याज देणाऱ्या विविध प्रकारच्या योजना बोधडी पोस्ट ऑफिस उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मध्ये ग्रामीण डाक जीवन विमा दहा लाखाच्या विमा घेतल्यास दर वर्षी ला पन्नस हजार रुपये दर वर्षाला मुद्दल रक्कम सोडून बोनस जमा होते. तर पाच लाख विमा घेतल्यास दर वर्षाला मुद्दल रक्कम सोडून पंचवीस हजार रुपये दर वर्षाला बोनस मिळते तर एक लाख विमा घेतल्यास दर वर्षाला मुद्दल रक्कम सोडून पाच हजार रुपये बोनस दिला जातो. तसेच शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांनसाठी डाक जीवन विमा योजना वीस लाख रुपयांचा विमा घेतल्यास दर वर्षाला मुद्दल रक्कम सोडून एक लाख, सोळा हजार रुपये वर्षाला बोनस मिळतो तर दहा लाखाचा विमा घेतल्यास आपली मुद्दल रक्कम सोडून दर वर्षाला आठावन हजार रुपये बोनस मिळते या योजनेत वयोमानानुसार हप्ता येतो.तसेच राष्ट्रीय बचतपत्र, पी.पी.एफ.सुकन्या समृद्धि खाते योजना. आर.डी. खाते,पोस्ट बँक खाते, योजना,अटल पेन्शन योजना, बचत खाते योजना,ग्रामीण डाक जीवन विमा RPLI व डाक जीवन विमा PLI योजना,पैशाची बचत व विमा संरक्षण,सर्वात जास्त व्याज एकाच योजनेत तीन बार व इतर योजनेचा बचत महामेळावा दिनांक २६ व २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास सर्व योजना ची माहिती नांदेड मुख्य पोस्ट ऑफिस चे मार्केटिंग एक्सिकेटीव्ह सुरेश सिंगेवार हे माहिती व बचती संबधी मार्गदर्शन देणार आहेत.या बचत मेळावा सकाळ ०९ वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दोन दिवस हा डाक महा बचत मेळावा चालणार आहे.तरी नागरिकांनी या सवर्ण संधीचा लाभ बोधडी व बोधडी परिसरातील व्यापारी, शेतकरी, कर्मचारी, शेतमजूर, आणि गावातील नागरिकांनी घ्यावा असे अहवान बोधडी येथील पोस्ट मास्तर विलास श्रीमनवार यांनी केले आहे.
या मेळाव्यास डाक अधीक्षक नांदेड व डाक निरीक्षक किनवट हे उपस्थित राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी मार्केटिंग एक्सिकेटीव्ह सुरेश सिंगेवार मोबाईल क्रमांक 7038829990