लियाकत शाह
जळगाव , दि. २७ :- बोदवड पंचायत समिती स्तरावर विविध तक्रारी व समस्या घेऊन नागरिक येत असतात.यात नागरिकांचा पैसा व वेळेचा अपव्यय होत असल्याने पंचायत समिती स्तरावरच नागरिकांच्या समस्या व प्रश्न ऐकून घेण्यासाठी येथील सभापती किशोर गायकवाड यांनी नागरिकांची धावपळ पाहता व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरचं सभापती दरबार घेण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतची प्रकिया सुरू आहे. या आयोजित सभापती दरबारात तक्रारदारांबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांची समस्या व तक्रार जाणून घेतली जाणार आहे. बहुतेक वेळा तालुका प्रशासकिय स्तरावर जनतेच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही.परिमाणी त्यांना वारंवार तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पंचायत समितीत नाहक चकरा माराव्या लागतात. त्यामुळे तालुक्यातील गोरंगरीब वंचित,व पात्र लोकांची यापासून मुक्तता व्हावी व त्यांचे प्रश्न व विविध प्रकारच्या तक्रारी तसेंच त्यांना भेडसावत असलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी त्याच्या तक्रारींना प्राधान्य देऊन त्या सटावेत हा सभापती दरबार घेण्याचा उद्देश असल्याचे मत सभापती श्री.गायकवाड यावेळी मांडले. अनेकदा पंचायत समिती स्तरावर विविध लोकांच्या तक्रारी व प्रश्न अनेक दिवसांपासून धूळ खात पडून असल्याने जनमानसात प्रशासनाबद्दल रोष व्यक्त केला जात असतो. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व तक्रारींना न्याय न मिळाल्याने परिमाणी तक्रारदार पंचायत समिती स्तरावरूनचं सुटणारे प्रश्न व समस्या मार्गी लागाव्या म्हणून जिल्हा स्तरावरून पाठपुरावा करून न्याय मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. हे लक्षात घेता पंचायत समिती स्तरावरील विविध समस्या, प्रश्न समजून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी त्या विभागाच्या जबाबदार अधिका-यांना सुचना करीत प्रलंबित समस्या या सभापती दरबाराच्या माध्यमातून मार्गी लावल्या जाणार असून याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही पुढे बोलतांना सभापती श्री.गायकवाड यांनी सांगितले.