लिगायत शहा
गेल्या काही वर्षापासून शेतीमधील तंत्रज्ञानात मोठा बदल होतोय, शेतकरी निर्याती बद्दल बोलू लागला आहे. आता नोकरी मागणार नाही, तर रोजगार देणारा शेतकरी तयार होतोय याचा आनंद आहे. शेतकऱ्यांनी निर्यातक्षम उत्पादन घेऊन निर्यातीच्या क्षेत्रात पुढे यावे या क्षेत्रात मोठ्या संधी आहे असे उद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले ते विदेश व्यापार महानिर्देशनालयच्या ॲग्रोवर्ल्ड व आत्मा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्यात बंधू शेतमाल कार्यशाळा प्रसंगी जिल्हा नियोजन समिती सभागृह जळगाव येथे बोलत होते. याप्रसंगी विदेश व्यापार महानिर्देशनालयचे दशरथ पराते , अनिल कणसे, जिल्हा कृषी अधिकारी अधीक्षक संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा अग्रणी बँकेचे अरुण प्रकाशजी, प्रकल्प उपसंचालक आत्माचे संजय पवार, नाबार्डचे श्रीकांत झांबरे, जिल्हा उद्योग केंद्राचे साहेबराव पाटील, ॲग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण, केळी निर्यातदार शेतकरी प्रेमानंद महाजन, सदानंद महाजन आदींची उपस्थिती होती. शेतीला दुग्ध व्यवसाय तसेच पूरक व्यवसायाची जोड दिल्यास शेती अधिक फायद्याची होऊ शकते असे ही यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले. यावेळी बोलताना विदेश व्यापार महानिर्देशनालयचे कणसे म्हणाले कार्यशाळेला उपस्थित तरुण शेतकरी नक्कीच निर्यातीबाबत विचार करतील आणि त्यांच्या माध्यमातून देशाला जास्तीत जास्त परकीय चलन मिळवून देईल जैन इरिगशनचे अंतराष्ट्रीय तज्ज्ञ के. बी. पाटील यानी यावेळी बोलतांना जिल्ह्यातील शेतकर्यानी आपल्या मानसिकतेत बदल करुन निर्यातक्षम शेतमाल तयार करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माचे प्रकल्प उपसंचालक संजय पवार व ॲग्रोवर्ल्डच्या प्रविण देवरे यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी केले.