दुःखदायक घटना…
अमीन शाह
रावेर , दि. ०६ :- बाप हा बापच असतो बाप अन मुलाचा प्रेम हा एक मित्रा सारखा असतो कालच आम्ही दिलेल्या बातमी प्रमाणे एका मुलाने आपल्या जन्मदात्या बापास मारून टाकले होते तर आज त्याच्या विपरीत घटना घडली आहे रावेर शहेरात राहत असलेल्या एका बापास पोलिसांनी चोरी केल्याच्या आरोपात अटक केली होती तर आपल्या बापास अटक झाल्या मुले प्रचंड मानसिक धक्का बसल्या मूळे एक युवकाने रेल्वे समोर येऊन आपला जीव दिला असल्याची हृददायक घटना घडली आहे ,
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार येथील कुंभार वाड्यात रविंद्र कुंभार हे आपल्या एक मुलगा मयूर मुलगी पत्नी सह आनंदात रहात होते , मात्र गुरुवारी विपरितच घडले याच परिसरात झालेल्या एका चोरी प्रकरणात पोलिसांनी रविंद्र कुंभार यांना संशयित म्हणून अटक केली आपल्या वडिलांना झालेली अटक याचा प्रचंड धक्का मयूर प्रजापती 22 याला बसला व त्याने रेल्वेच्या खमंबा नंबर 178 , 17, 21 , वर भरधाव रेल्वे च्या समोर येऊन आपले जीवन संपविले अशी चर्चा स्थनिक लोक करत होते रात्री मोठ्या शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मृतक मयूर हा उत्कृष्ठ पेंटर मूर्तिकार होता घरातील तो एकमेव कमावता होता पुढच्या महिन्यात त्याच विवाह निश्चित झाला होता त्याच्या आत्महत्ये ने परिसरात दुःख वायकत केले जात असून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्याच्या वडिलांना मुलगा गेल्याची बातमी कशी सांगायची हा पेच पोलिसांना पडला आहे ,