Home मराठवाडा ओम साईराम स्टील कंपनीत भट्टीच्या स्फोटात सात ते दहा कामगार जळून ठार...

ओम साईराम स्टील कंपनीत भट्टीच्या स्फोटात सात ते दहा कामगार जळून ठार झाल्याची भिती

149

सर्वत्र उडाली खळबळ

नजाकत सययद

जालना : येथील औरंगाबाद रोडवर असलेल्या एमआयडीसी परिसरातील ओम साईराम स्टील कंपनीत गुरुवारी दुपारी भट्टीच्या स्फोटात सात ते दहा कामगार जळून ठार झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, एमआयडीसी मधील ओम साईराम स्टील कंपनीत दु. ४ वाजेच्या दरम्यान भट्टीजवळ ३० ते ३५ कामगार काम करत असतांना अचानक या भट्टीचा स्फोट होऊन यात सुमारे सात ते दहा जण जळून ठार झाल्याची घटना घडली.
दरम्यान या घटनेत ठार झालेल्या कामगारांना येथील सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही जणांना औरंगाबाद येथे रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले असल्याचेही कळते, या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता असून या सर्व घटनेबद्दलची माहिती देण्याच्या बाबतीत पोलीसांकडून मात्र टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान ठार झालेल्यांची नावे मात्र अजुनपर्यंत समोर आली नसून ठार झालेल्यांमध्ये इतर राज्यातील कामगारांचा समावेश असल्याचे कळते.
दरम्यान या दुर्देवी घटनेनंतर परिसरात तणाव वाढू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
एमआयडीसी परिसरात स्टील कंपन्यांमध्ये अधूनमधून अशा प्रकारच्या घटना नेहमी घडत असतात परंतु ही घटना आतापर्यंतची सर्वात मोठी घटना आहे. यापूर्वी अनेकदा असे प्रकार घडूनही कोणतीही गंभीर दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही. विशेष म्हणजे यात मृत्युमुखी पडणारे कामगार हे परराज्यातील असल्यामुळे पोलीस प्रशासनही यात दिरंगाई दाखविते. आता तरी निदान या प्रकरणात गांभीर्याने घेतली जावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.