Home विदर्भ बोर्डी येथे अगंणवाडीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला

बोर्डी येथे अगंणवाडीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला

150

एक मुलगी असनार्या महिलेचा केला सन्मान…!

देवानंद खिरकर

अकोट – तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे आज जागतिक महिला दिनाच्या पर्वावर बोर्डी येथे अगंणवाडीत पोषण पंधरवाडा या अभियानाचे अगंणवाडीत 8 मार्च ते 22 मार्च या दरम्यान विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आज जागतिक महिला दिन अगंणवाडीत साजरा करण्यात आला.या मधे गावातील एक मुलगी असलेल्या महिला जीला मुलीचा अभिमान आहे अशा पल्लवी वरणकार यांचा छोटीशी भेट देवून सत्कार करण्यात आला.त्याच प्रमाने पंधरवाड्याची सुरुवात जी हात धुण्याचा कार्यक्रम घेवून करण्यात आली.अगंणवाडी सेविका वंदना इंगळे यांचा अपंगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.यामधे अगंणवाडी सेविका व मदतनीस व अशा वर्कर,गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे संचालन दिपिका खिरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन वंदना इंगळे यांनी केले.