Home महाराष्ट्र आहो चक्क , राज्य सरकार आणणार मोहाची दारू

आहो चक्क , राज्य सरकार आणणार मोहाची दारू

789

किंमत ही ठरली…!

अमीन शाह

दारूच्या विक्रीतून मिळणाऱ्या टॅक्सद्वारे कोणत्याही राज्याला सर्वाधिक महसून मिळतो, असं सारेच बोलतात. पण, जर सरकारच दारू बाजारात आणणार आहे असं म्हटलं तर विश्वास बसणार नाही, हो ना? पण, असंच काही होऊ घातलंय आणि त्यासाठीचा करारही झाला आहे. शिवाय त्या दारूच्या बॉटलची किंमतही ठरली आहे.
सरकारनं मोहाची दारू लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या दारूमध्ये अल्कोहोलही असेल. पहिल्यांदाच सरकार असं करणार आहे. या दारूला महुआ न्युट्रिबेव्हरेज असं नाव दिलं आहे. येत्या महिन्याभरात याची विक्री सुरू केली जाण्याची शक्यता आहे.

या दारूमध्ये पोषण तत्वे असतील, असा दावा केला जात आहे. यात अल्कोहोलचे प्रमाण ५ टक्क्यांच्या आसपास असेल. भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महामंडळाच्या साह्याने आयआयटी-दिल्लीने दोन वर्षांच्या संशोधनानंतर या पेयाची निर्मिती केली आहे.
या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्णा यांनी सांगितले की, सध्या आम्हाला या पेयासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगीची गरज आहे. त्यानंतर दिल्लीतील पाच ठिकाणी हे पेय विकले जाणार आहे. ट्राईब्स इंडिया नावाच्या स्टोअर्समध्ये हे पेय मिळेल. त्याची किंमत ७५० एमएलच्या बॉटलसाठी ७५० रूपये इतकी आहे. हे पेय सहा प्रकारच्या फळांच्या फ्लेवरमध्ये उपलब्ध असेल. या पेयाच्या निर्मितीसाठी या महामंडळानं राष्ट्रीय संशोधन विकास संस्थेशी करार केला आहे. त्यासाठी या पेयाच्या निर्मितीचं तंत्रज्ञानही दिलं जाणार आहे.