Home आध्यात्मिक पाच दशकांच्या इतिहास जपत आहे नारायणपूर येथील भागवत सप्ताह…!

पाच दशकांच्या इतिहास जपत आहे नारायणपूर येथील भागवत सप्ताह…!

286

वर्धा / नारायणपूर १६ :- समुद्रपुर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथे गेल्या बेचाळीस वर्षांपासून तुकाराम बिज उत्सव समिती तथा नारायणपूर गोविंदपुर बल्लारपूर गणेशपुर येथील गावकऱ्यांच्या सहकार्याने स्थानिक श्री गोपाल कृष्ण मंदिरात अंंखड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन करण्यात येते सदर सप्ताहाची श्री गणेशा सन १९७८ मध्ये ह.भ.प श्री पुरुषोत्तम महाराज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

तेव्हा पासून हा सप्ताह परंपरेने साजरा केला जात आहे सदर सप्ताहात तुकाराम बिज उत्सव व एकनाथ षष्ठी हे दोन उत्सव साजरे केले जातात सदर भागवत सप्ताहाची सुरुवात दि.११मार्च ला होत आहे या सप्ताहात भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून भागवताचार्य पुरुषोत्तम महाराज बावस्कर बुलढाणा यांच्या मधुर वाणी तुन कथेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच ह.भ.प शेंद्रकर महाराज परभणी ह.भ.प जगन्नाथ महाराज मुंबई ह.भ.प पाचपोर महाराज अकोला ह.भ.प.सोपाण काका काळबांडे अमरावती गुरूवर्य ज्ञानेस्वर महाराज वाघ भैरवगड यांचें कीर्तन होणार आहे सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी चार ही गावातील नागरिक प्रयत्न करत असल्याने एकात्मतेचे प्रतीक दिसून येत आहे.