Home महत्वाची बातमी मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणालेत

मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणालेत

195

राजेश भांगे

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित अत्यंत महत्त्वाची कॅबिनेट बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्रात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या पार्शवभूमीवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्स हे महाराष्ट्र आहेत. आज (दिनांक १७ मार्च) संध्याकाळी ६ वाजेपर्यंत महाराष्ट्रात एकूण ४० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालीये.
अशात आज (१७ मार्च) सकाळपासूनच मुंबईतील रेल्वे म्हणजेच मुंबईची लाईफ लाईन बंद केली जाणार अशी चर्चा होती. रेल्वेसोबतच मुंबई मेट्रो आणि मुंबईतील बेस्ट बसेस देखील बंद केली जाईल अशी देखील चर्चा होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील अत्यावश्यक असणाऱ्या ट्रान्सपोर्ट सुविधा लगेच बंद करणार नसल्याचं म्हटलंय.
आज पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील कोरोनाच्या संबंधित परिस्थितीवर चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या माहितीत महाराष्ट्रात सध्या २६ पुरुष आणि १४ महिला कोरोना (#COVID19) पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यामधील एकाची परिस्थिती गंभीर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
कॅबिनेट बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीत उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना पुन्हा एकदा गरज नसल्यास बाहेर पडू नका असं आवाहन केलंय. मुंबईकरांनी अनावधायक प्रवास टाळा, मुंबईतील गर्दी कमी झाली नाही तर मात्र नाईलाजास्तव मुंबईतील बस आणि ट्रेन बंद कराव्या लागतील. पुण्यात अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली दुकानं बंद ठेवली आहेत. आजपासून पुढील तीन दिवस पुण्यातील हॉटेल्स आणि बार देखील बंद राहणार आहेत. अशात मुंबईतील दुकानदारांनी जीवनावश्यक सुविधांव्यतिरिक्त अन्य दुकानं बंद ठेवावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीये. सर्वांनी सहकार्य केलं तर महाराष्ट्रावरील कोरोनाचा धोका टाळला जाऊ शकतो असं उद्धव ठाकरे यांनी पुन्हा बोलून दाखवलंय.
आज दुपारपासून काही बातम्या प्रसारित करण्यात आलेल्या, ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सात दिवसांची सुटी जाहीर करण्यात आल्याचं बोललं जात होतं. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना ७ दिवसांची सुटी देण्यात येणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलाय. पन्नास टक्के कर्मचारी ऑफिसला येऊन बाकीचे कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ कसं करू शकतात यावर विचार केला जाणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.