पोलीस व जवानांच्या शोध मोहीमेस यश; जाणून घ्या कुठं झाली कारवाई
राजेश भांगे
आसाममधील बडागाव येथे उदलगुरी पोलीस व लश्कराच्या जवानांनी राबवलेल्या शोध मोहीमेस यश आले आहे. या ठिकाणाहून जवानांनी एक एके-४७ रायफल, १२ जिवंत काडतूसं, एक रॉकेट लाँचर व वायरसह डिटोनेटर्स आदी स्फोटक सामग्री जप्त केली आहे.
या अगोदर छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील बरसूर येथे काल डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डच्या जवानांच्या हाती मोठं यश आलं होतं. या ठिकाणी झालेल्या चकमकीनंतर दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असुन, मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला होता.