Home महत्वाची बातमी करोना नंतर महाराष्ट्रात नवीन संकट येणार असल्याची चाहूल ,

करोना नंतर महाराष्ट्रात नवीन संकट येणार असल्याची चाहूल ,

132

दोघांचा मृत्यू अनेकांना लागण ,

अमीन शाह

सिंधुदुर्ग, 18 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या 42 वर पोहोचली आहे, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहून सर्वांनी त्याचा धसका घेतला आहे आणि त्यातच आता या महाभयंकर कोरोनासह आणखी एक संकट येऊन ठेपलंय, ते म्हणजे माकडतापाचं
सिंधुदुर्गात माकडतापाचं संकट आलं आहे. माकडतापाने दोघांचा बळी घेतला आहे. तर 3 महिन्यांत 18 रुग्ण आढळलेत.

जिल्ह्यातील डेगवे आणि पडवे गावात माकडतापामुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या दोघांवरही गोवा बांबुळी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान एका रुग्णा चार दिवसांपूर्वी तर एका रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाला.
त्यामुळे कोरोनासह आता नागरिकांमध्ये माकडतापाबाबतही भीती निर्माण झाली आहे. या आजाराने दोघांचा बळी घेतल्यानंतर दोडामार्ग तालुक्यातल्या 8 गावांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

माकडतापाची लक्षणं

सुरुवातीला अंगदुखी, ताप, सांधेदुखी, ताप गेला तरी सांधेदुखी कायम राहते, अशक्तपणा अशी लक्षणं माकडतापात दिसून येतात.