जीवन महाजन
नंदुरबार ,
या ओळी आपण वेळोवेळी ऐकलेल्या असतील , वाचलेल्या असतील पण याचा प्रत्यय नंदुरबार शहरात अनुभवास आला . संचारबंदी लॉक डाऊन मुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे तर काहींना उपवाशी पोटी राहून दिवस काढावे लागत आहे. नंदुरबार शहरात हातावर पोट असलेल्या १००० हजार कुटुंबांसाठी नंदुरबार जिल्हा पोलीस देवदूत ठरले आहेत .पोलिसांनी १५ दिवस पुरेल इतका किराणा या कुटुंबाना वाटप केला.
नंदुरबार शहराच्या बाहेर असलेल्या वळण रस्त्यावर असलेल्या झोपड्या मध्ये अनेक परप्रांतीय मजूर राहतात त्यांच्या कडे रेशन कार्ड नाही संचारबंदीमुळे हाताला काम नाही आणि पोटाला भाकर नाही अशी गत झाली आहे आपल्या लहान मुलांसह उपवाशी झोपण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता .हे त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यावर लक्षात येईल . त्याच प्रमाणे माळीवाडा परिसरात अनेक आदीवासी बांधवांना व गरीब मुस्लिम परिवारांना देखील किराणा माल देण्यात आला
नंदुरबार शहरात आलेल्या या कुटुंबांकडे अन्न धान्य नसल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या कर्मचार्यांनी आपल्याला मिळालेली बक्षिसांची रक्कम या कुटुंबांच्या किराणा साठी देण्याचा निर्णय घेतला त्यात वरिष्ठ अधिकार्यांनी भर घातली आणि जिल्ह्यातील दानशूर व्यक्तीची मदत घेत या कुटुंबाना दिलासा दिला
महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक नंदुरबार