पवन विलास जाधव ,
बार्शीटाकळी , अकोला
बार्शीटाकळी तालुक्यातील ग्रामीण भागात एका बाजूला अशापद्धतीचं भीतीमय वातावरण असलं, तरी दुसरीकडे मात्र कातखेड येथे क्रिकेट खेळताना व वडगाव येथे टोळक्यानं गप्पा मारताना दिसत आहे ग्रामीण भागातील कातखेड येथे विझोरा आणि गोरव्हा या गावातील तरुण युवक कातखेड येथी क्रिकेट मॅच तीन दिवसांपासून खेळायला येत आहे यांना वारंवार कोरोना विषय माहिती असताना मनावर घेतांना दिसत नाही त्याच बरोबर अजूनही मुलं एकत्र येऊन गाव क्रिकेट खेळतात, चौकात ,लुडो खेळतात दिसत असून कोरोनाविषयी पाहिजे तितकं गांभीर्य अजून ग्रामीण भागात गावाकडे कोरोनाला पाहिजे तितका गांभीर्यानं घेतलं जात नाही.पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल वडगाव येथील दररोज सकाळी गावातली तरुण मंडळी टोळक्यानं गप्पा मारताना दिसून येते. दुपारी पत्ते खेळताना दिसून येते. गावाकडे कोरोना येत नाही, आमचा बातम्यांवर विश्वास नाही, असं ते म्हणतात. याशिवाय कुरडया, पापडं, शेवया बनवण्यासाठी महिला एकत्र जमत आहेत,