नांदेड , दि. ३० ( राजेश भांगे ) – जगात तसेच देशात कोविड १९ नोबेल कोरोना ने सर्वत्र हाहाकार माजवला असुन देशातील व राज्यातील शासकीय, प्रशासकीय यंत्रणा आहोरात्र या विषयी अत्यंत गंभीर असतानाच नांदेड येथील इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या सोबत शासकीय रूग्णालय नांदेड येथे तेथील डाॕक्टरां कडुन अत्यंत घ्रनास्पद प्रकार घडल्याचे समजताच त्यांच्याशी फोन करून संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्या सोबत घडलेले कटु अनुभव आपल्या शब्दात सांगितले .
दि. २८ मार्च रोची सायंकाळी चार वाजता विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात कोरोना टेस्ट साठी गेलो होतो. पन्नास नंबरच्या कोरोना वार्डात माझी नाव नोंदणी व चौकशी करून एक्स रे काढण्यासाठी तेवीस नंबरच्या कक्षात जायला सांगितले. मी जाऊन एक्सरे काढून परत पन्नास नंबरच्या कक्षात आलो तर सारे डॉक्टर अक्षरशः पळून जात होते. आता माझे पुढे काय ? म्हणून मी त्यांच्या मागे पळत होतो तर आमची ड्युटी फक्त पाच पर्यंत होती, आता सोमवारी ये असे म्हणून सारे निघून गेले. नोंदणी कक्षातील कर्मचारीही कॅबिन बंद करुन जात होते. त्यांना मी पुढे काय करू असे विचारले असता मला १११ नंबरवर जाण्यास सांगितले. तिथे खूप गर्दी होती. तेथील डॉक्टर आणि कुणीही कर्मचारी रूग्नांबरोबर कांहीही बोलण्यास तयार नव्हता. मला बाहेर बसायला सांगण्यात आले. मी तासभर बाहेर बसूनही कुणी आत बोलावत नाही म्हणून आत गेलो व खूप विनंती केली असता एका डॉक्टरने संगणकावर माझा एक्सरे तपासला व *संशयित* म्हणून पुन्हा मला बाहेर बसायला सांगितले. मी तासभराने पुन्हा आत गेलो तर सारे मोबाईल मध्ये गुंग होते. मी विचारत होतो तर दिसत नाही काय आम्ही कामात आहोत असे म्हणून मला पुन्हा बाहेर बसायला सांगितले. मला काय झाले ते सांगा असे म्हणालो तर एक डॉक्टर म्हणाले, जा वार्डात भरती व्हा, पाच दिवस रहावे लागेल. पुण्याला स्यांपल पाठऊ एक दोन दिवसात असे म्हणून मला पुरते घाबरून टाकले. मी घरी फोन करून सांगितले व भरती होण्यास तयार झालो, तरी मला बाहेर बसा, मोठे डॉक्टर येऊन भरती करतील असे म्हणाले व मी पुन्हा बाहेर वाट पाहत बसलो. पण तेथील कुणीही माझ्या बाबतीत गंभीर नव्हता, उलट ते सारे माझी टिंगलटवाळी करीत होते. मी बाहेर बसून शिपायाला विचारले की मोठे डॉक्टर कोण आहेत व ते कधी येतील. ते म्हणाले आता कुणी मोठा डॉक्टर येथे येणार नाही, येथे असेच नेहमीचा गोंधळ असतो. नवनवीन रोगी येतात व हे नवीन शिकाऊ डॉक्टर त्याच्यावर प्रयोग करीत असतात. हे ऐकुन मी आणखी पूर्णतः घाबरलो. येथे डीन कोण आहेत असे विचारलं असता डॉ. वाकोडे असे त्या शिपायाने सांगितले. डॉ. वाकोडे हे माझे परिचित आहेत. मी सामाजिक कार्यकर्ता असल्याने त्यांची भेट झाली होती. माझ्याकडे त्यांचा नंबर होता व मी फोन लावला. त्यांनी पन्नास नंबरला जा, ते चोवीस तास चालू राहते, असे सांगितले. मी बंद आहे असे म्हणालो तरीही तेथे जाऊन फोन लावा असे त्यांनी सांगितले. तेथे कुणीही नव्हते तरीही मी वाकोडे सरांचा मान राखून तिथे गेलो, तेथे पुन्हा कुणीही नव्हते. मी पहारेकरी यांना विचारले असता आता सोमवार पर्यंत येथे कुणीही येत नाही, तरीही बाजूला ५१ नंबरचे कोरोना कक्ष आहे तिथे जाऊन भेटा असे सांगितले. त्यानुसार तेथे गेलो असता तेथील कर्मचाऱ्यांनी काचेचे दार उघडले नाही. मी जास्त दार वाजवलं व आग्रह धरला तर *डॉ. ज्ञानेश्वर* हे बाहेर येऊन शिवीगाळ करत होते. तुम्ही येथे आलातच कसे ? हा कोरोना कक्ष आहे, माहित नाही काय ? आम्हाला येथे फार भीती वाटते, आम्ही कुणालाही भेटत नाही असे ते म्हणाले. मी म्हणालो डीन साहेब बोलणार आहेत तर ते म्हणाले कोण डीन ? मी कुणालाही ओळखत नाही. डॉ. वाकोडे सर यांना बोला म्हणून मी फोन लावून दिला तर कोण वाकोडे म्हणून ते टाळत होते पण मी त्यांच्या हातात फोन दिला तर त्यांना सरांनी झापले. तेंव्हा कुठे त्यांनी मला तपासायला सुरुवात केली. माझा रिपोर्ट आत कोरोणा कक्षात नेऊन अर्ध्या तासाने ते बाहेर आले व तुम्हाला कांहीही झाले नाही. सर्दीच्या गोळ्या लिहून देतो, त्या घेऊन पाच दिवस घरीच रहा असे सांगितले. १०५ मधून गोळ्या घ्या म्हणून सांगितले. तेथे गेल्यावर अॕसिडीटीची एक गोळी देऊन बाकीच्या बाहेरच्या मेडिकल स्टोअर्स मधून घ्या असे सांगितले. कोरोनाची व सर्दी फडस्याच्या कोणत्याही गोळ्या आमच्याकडे नाहीत म्हणून अक्षरशः तिथून हाकलून दिले.
साहेब, आता मला प्रश्न पडला की देशभर कोरोना बद्दल खूप मोठी चिंता व्यक्त केली जात आहे पण नांदेडच्या सरकारी रुग्णालयात मात्र कसलीही स्वच्छता, दक्षता, सौजन्य नाहि शुगर पेशंट असेल तर त्याला वेळेवर चहा नाशटा लागतो त्याची सोय नाहि आणि चादर नाहि उशी नाहि औषधांचा अभाव आहे. कोरोना कक्ष नावालाच आहे. देशभर गाजावाजा, आणि नांदेडमध्ये फज्जा उडाला आहे. दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ अशी नांदेडची अवस्था झाली आहे. आपण आणि पोलीस प्रशासन लोकांना घरात राहण्यासाठी खूप खूप मेहनत घेत आहात. यावर शासनाचे लाखो करोडो खर्च होत आहेत, पण काय उपयोग ? नांदेड शहरात किमान चार पाच ठिकाणी मोफत तपासणीची व्यवस्था असायला हवी होती. ती कुठे दिसली नाही म्हणून विष्णुपुरी येथे गेलो पण तिथे फार मोठा घोळ आणि गोंधळ आहे. शिकाऊ डॉक्टरांच्या हवाली संपूर्ण रुग्णालय आहे, मग मोठमोठ्या पगारी घेणारे ज्येष्ठ व अनुभवी डॉक्टर कुठे आहेत ? एक म्हणतो की तुम्ही कोरोना संशयित आहात तर दुसरा म्हणतो तुम्हाला कांहीही झाले नाही. कुणावर विश्वास ठेवावा ? माझ्यासारख्या सुशिक्षित अभियंत्यांची ही अवस्था तर सर्वसामान्य व गोर गरीब रुग्णाची काय अवस्था असेल ? बाहेर किराणा देखील अंतर ठेवून रांगेत उभे राहून दिले जात आहे तर येथे रुग्णालयात जाम गर्दी, सर्व रस्ते सूनसान झालेत पण या रुग्णालयात नेहमीसारखी लोकांची गर्दी, कसलीच सुरक्षा खबरदारी नाही, यांना जणू कोरोणाचे कांहीही देणे घेणे नाही. डॉक्टर व कर्मचारी मास्क आणि सर्व सुविधा युक्त आणि पब्लिक तशीच नेहमीसारखी असुरक्षित ! रुग्णालयात जनतेला मास्क आणि औषधी दिली जात नाहीत. बाहेरही कुठे मास्क स्वस्तात उपलब्ध होत नाहीत. डेटॉल आणि हॅण्ड सॕनिटायझर आणि हॅण्ड वाश मिळत नाहीत, सारा काळा बाजार चालू आहे. चोवीस तास तपासणी ही फक्त नावालाच, फक्त कागदोपत्री च असुन त्यांच्या सोबत घडलेला धक्कादायक प्रकार
इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर,यांनी आपल्या शब्दात मांडले. तरी हि सर्व घटना समजताच सर्व सामान्य नागरिकांन मधुन संताप व्यक्त होत असुन. नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री व जिल्हाधिकारी यांनी तात्काळ या शासकीय रूग्णालयात चाललेला आनागोंदि कारभाराकडे लक्ष घालून अशा संवेदनशील प्रसंगी देखील अमानुष, मुजोरपणा व रूग्णांचे मानसिक छळ करणाऱ्या बेजाबदार डाॕक्टरां वर कडक कारवाई करत त्वरीत निलंबित करून येथील परिस्थिती सुधारावी अशी मागणी नागरीक व समाजसेवकां कडुन होत आहे.